HOME   टॉप स्टोरी

आजलातूर कार्यालयास खा. सुनील गायकवाड यांची भेट

आजची बातमी आज, आताची बातमी आताच वाचायला-पहायला शिकवणारे पोर्टल!


लातूर: लातुरचे खासदार सुनील गायकवाड केंद्राच्या आयटी स्थायी समितीचे सदस्य आहेत. स्वत: संपादक आहेत आणि बर्‍याच केंद्रीय समित्यांचे सदस्यही आहेत. त्यांनी आजलातूरच्या नव्या कार्यालयाला भेट दिली. आजलातूर आणि संवाद एसएमएस सेवेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. कुणालाच काही माहित नसताना रवींद्र जगताप यांनी एसमएस न्यूज सेवा सुरु केली, देशात आयटी सेवा एवढ्या प्रगतीपथावर नसताना आजलातूर नावाचे न्यूज पोर्टल सुरु केले, आज अनेक न्यूज पोर्टल आहेत. पण सुरुवात रवींद्र जगताप यांनी केली. त्याचं अनुकरण अनेकांनी केलं. माझ्या लोकसभेच्या दोन्ही निवडणुकात या सेवांचा मला चांगला फायदा झाला असे मत या निमित्ताने खा. गायकवाड यांनी व्यक्त केले. आज मी अनेक वर्तमानपत्रे वाचतो पण आजलातूर.कॉम दररोज नियमित पाहतो. संवाद न्यूज सेवेवर आलेल्या बातमीचा मला फायदा होतो. सरकारने या माध्यमाला मान्यता द्यावी अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. कुठल्याही बातमीचा शेवट केल्याशिवाय आजलातूर सोडत नाही. आज नऊ वर्षे पूर्ण झाली. दशकपूर्ती सोहळा मजबूतपणे साजरा करावा, आयटी क्षेत्रातील तज्ञांना निमंत्रित करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजलातुरच्या पत्रकारितेमुळे रेल्वे सेवेत अनेक सुधारणा झाल्या, बोगीचाही कारखाना आला, सुर्यासारखी आपली पत्रकारिता आहे, ती अशी तेजाळत राहो अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर कांबळे, अनंत मिरासदार, प्रदीप पाटील खंडापूरकर, अनंत मिरासदार, सौरभ बुरबुरे, किशोर पुलकुर्ते उपस्थित होते.


Comments

Top