HOME   टॉप स्टोरी

आ. विक्रम काळे सुखरुप, ऐका लाईव्ह मुलाखत

आ. विक्रम काळे आणि पंचायतराज समितीच्या सदस्यांवर काश्मिरात हल्ला पण सगळे सुखरुप


लातुरचे सुपुत्र आ. विक्रम काळे यांच्या वाहनावर काश्मिरात अतिरेकी हल्ला झाला. त्यातून ते बालंबाल बचावले. त्यांच्याशी आम्ही फोनवरुन बातचीत केली. ते म्हणाले आम्ही सुखरुप आहोत. नियोजित दौरा आटोपून परत येत आहोत. पण यावेळी नेमके काय घडले याची माहिती त्यांनी दिली. या चित्रफितीत चित्रे जुनी आहेत पण आ. काळे यांची मुलाखत लाईव्ह आहे.
अनंतनाग जिल्ह्यातून जाताना वर्दळीच्या गावात आवाज आले, आम्हाला वाटले गाडीचे टायर फुटले असावेत, लोक सैरावैरा पळत होते. गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या, टायरही फुटले, आठदहा लोक जखमी झाले होते. आमचा दौरा अजून पूर्ण झाला नाही, परवा होईल. आम्हाला चांगले संरक्षण आहे. काश्मिरात जाणे धोकादायक आहे का असा प्रश्न विचारला असता अनेक लोक अमरनाथला जातात. सगळीकडे संरक्षण आहे. आम्ही गेल्यापासून सामान्य माणसाच्या मनाचा वेध घेत आहोत. काश्मिरातील सामान्य माणसाला शांतता हवी आहे. पण काही लोक राजकारण करीत आहेत. स्वतंत्र काश्मिरचा मुद्दा पुढे करुन राजकारणाचा डाव खेळला जात आहे असे आ. विक्रम काळे म्हणाले.


Comments

Top