HOME   टॉप स्टोरी

वडार समाजातील एकही माणूस बेघर राहणार नाही- मुख्यमंत्री

तीन महिन्यात समिती, निधी देणार, वडार समाजाच्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे वचन


लातूर: वडार समाजातील कुणीही बेघर राहणार नाही असं वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्यांनी आपली घरं बनवली त्यांना वार्‍यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले. लातुरात आयोजित वडार समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्यात ते बोलत होते.
वडार समाज हा विश्वकर्माच्या रूपात आपल्यात आहे. सर्व वडार समाजाच्या नागरिकांनी बांधकाम मजूर म्हणून आपल्या नावांची नोंद करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्राधानमंत्री आवास योजने मधून बांधकाम मजुरांना घरकुले देणार आहोत. त्याच सोबत या मजुरांना राज्य सरकारकडून ०१ लाख रूपये देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याची रूपरेषा ठरवण्यासाठी एक समिती गठीत करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. १९९५ नंतर वडार समाजाचा महामेळावा राजस्थान विद्द्यालयाच्या मैदानात लातूर येथे भरवण्यात आला होता. वडार समाज हा कष्टकरी समाज आहे. यामुळे या समाजास न्याय मिळवून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. वडार समाजातील तरूणांनी हातातील हातोडा खाली ठेवून हातात लेखणी घेणे गरजेचे आहे. पुढील १५ दिवसांमध्ये बांधकाम मजुरांची नोंदणी करूण घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर दिली. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गामधून SC/ST या प्रवर्गात आरक्षण देऊ असे अश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी दिले. वडार समाजातील एकही माणूस बेघर राहणार नाही याची दक्षता घेणार आहोत. मागील २४ वर्षात जी आश्वासने वडार समाजास सरकारकडून देण्यात आली होती त्याची पुर्तता झालेली नाही पण मुख्यमंत्र्यांनी अश्वासन न देता ही सर्व कामे करण्याचे वचन यावेळी देण्यात आले. या वेळी स्वामी सिद्रानेश्वर महाराजांनी येणार्‍या निवडणुकांमध्ये वडार समाजाचे २० आमदार तरी निवडून आले पाहिजेत असे म्हणाले. यावेळी मंचावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राम शिंदे, देवेंद्र फ़डणवीस, स्वामी सिद्रामेश्वर, खा. सुनील गायकवाड, अभिमन्यू पवार, आ. अरविंद निंबावळी, गोपाळराव पाटील, सुरेश पवार, मिलींद लातूरे उपस्थित होते.


Comments

Top