लातूर: शिवसेनेचे वरिष्ठ नेते, खासदार आणि मराठवाड्याचे संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांना अमित शहांच्या घडामोडी काहीच माहीत नाहीत! ते म्हणतात मी लातूर दौर्यावर आहे त्यामुळे मला काहीच माहित नाही. मात्र शिवसेना स्वबळावर एकटीच लढणार आहे. त्यामुळेच मी मराठवाड्याचा दौरा काढलाय. बघताय ना शिवसैनिकांनी किती गर्दी केलीय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहे!
काल खा. खैरे लातूर दौर्यावर आले होते. आजलातूरशी खास बातचीत करताना त्यांनी शिवसेनेच्या एकला चलोचा नारा दिला. शिवसेना एकटी लढली तरी नुकसान आहे, भाजपा एकटी लढली तरी नुकसान आहे. दोघे मिळून लढले तर हिंदू मतांची विभागणी टाळता येऊ शकते असे गणित राजकीय तज्ञ मांडतात पण भाजपाचा आता उतार चालू आहे. बारा पोटनिवडणुकीत या पक्षाला केवळ एक जागा मिळाली भाजपाचे संख्याबळ आता घटले आहे, असेही खैरे म्हणाले.
दरम्यान आज भाजपाचे अमित शाह आज उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. भाजपाविरोधी पक्षांनी पक्की मोट बांधताच भाजपाला आपल्या नैसर्गिक मित्राची, युतीधर्माची आठवण झाली म्हणून ते उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. या भेटीत भाजपाला नक्कीच एक पाऊल मागे घ्यावे लागेल अन्यथा, हिंदू मतांची विभागणी अटळ आहे. यामुळे दोघांचेही नुकसान होणार आहे असं तज्ञ सांगतात.
Comments