लातूर: काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचर्यांनी पगारवाढीसाठी संप सुरु केला. यात राज्यातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले पण लातुरात सगळ्या गाड्या वेळच्या वेळी काढा, संपात सहभागी होऊ नका असा दम वरिष्ठांनी बजावला. परिणामी औसा-लातूर अशी वाहतूक करणार्या विनाथांबा, विना वाहक बसवर दगडफेक झाली. एक मोठा दगड वाहकाजवळच्या खिडकीवर आदळला. यात काच तर फुटलीच पण चालकाच्या पायाला जखमा झाल्या. चालक एअबी होळकर यांनी तातडीने बस स्थानकात जमा करुन वरिष्ठांकडे रिपोर्ट केला. एअवढे होऊनही सगळ्या बसेस रोजचा प्रमाणेच सोडा असा आदेश वरिष्ठांनी बजावला. याच काळात औरंगाबाद आणि पुण्याच्या गाड्या होत्या. लांब पल्ल्याच्या या गाड्या न्यायला चालक, वाहक तयार नव्हते पण त्यांना ड्युटी बजावावी लागली. नंतर दहा वाजता लातूर एसटीने गाड्या पाठवणे बंद केले!
Comments