लातूर: लातूर शहरातील अनेक ठिकाणी दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रचंड पाणी जमते. पाणी जमण्याचा-तुंबण्याचा हा सिलसिला कायम सुरु असतो पण मान्सूनपूर्व तयारीत त्याचा विचार केला जात जात नाही. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकाच्या पुढे बनसुडे शू मार्टच्या पुढे गुढगाभर पाणी साचते, तसे कालही साचले. त्यातून लोकांनी कसाबसा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अनेकांची वाहने बंद पडली. अनेकांना वाहने बंद करुन ढकलत न्यावी लागली. हा नेहमीचा अनुभव असतानाही मनपा त्यावर उपाय करीत नाही. याचा निषेध सामाजिक कार्यकर्ते दत्ता मस्के, उमेश कांबळे यांनी केला असून यावर उपाय न केल्यास या भागातील नागरिक या पाण्यात जलसमाधी घेतील असा इशारा देण्यात आला आहे. याची तक्रार केल्यानंतर उपायुक्त त्र्यंबक कांबळे, नगरसेवक मंगेश बिराजदार आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. यावर लवकरात लवकर उपाय करु असे आश्वासन दिले.
Comments