लातूर: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा आज वाढदिवस, सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक ही प्रगती मोठी आहे, चकीत करणारीही आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने काय संकल्प केलाय असा प्रश्न विचारला असता, लातुरकरांची सेवा हाच संकल्प आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हाव्त आणि मी त्यांची पुन्हा सेवा करावी असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सर्वांचीच ते आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. या निमित्ताने लातूर तालुक्यातील १५० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
Comments