HOME   व्हिडिओ न्यूज

लोहार, कुंभार, माळी, धनगर सत्तेत गेला नाही!

विधानसभा एकट्याने लढू, लोकसभेत सेक्युलरांसोबत समझोता करु- आंबेड्कर


लातूर: अनुसुचित जाती जमातीला आरक्षण होतं म्हणून त्यांना सत्तेची संधी मिळाली. पण माळी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, धनगर कधी सत्तेत गेले नाहीत. त्यांना ही संधी मिळावी म्हणून वंचितांना एकत्र करण्याची मोहीम आरंभली आहे अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते लातुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी विधानसभा आम्ही स्वबळावर लढवू पण लोकसभा निवडणुकीसाठी सेक्युलर पार्टींसोबत समझोता करु असेही आंबेडकर म्हणाले.


Comments

Top