HOME   व्हिडिओ न्यूज

पानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप

गावाला ठाणे आणि वाढीव पोलिस कर्मचारी देऊ- एसपी डॉ. शिवाजी राठोड


पानगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात १० वी १२ वी व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना २ हजार वह्या व शालेय साहित्याचे वाटप लातुरचे पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लातूर येथील अत्यंत गरीब परीस्थितीत सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले सीए मोहसिन शेख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुकेश भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून आसिफ बागवान, पानगावचे उपसरपंच पैगंबर शेख, पोलिस निरीक्षक आर.आर.करकसे, वैदकीय अधिकारी जे.एम.हुजुरे, ग्रा.वि.आधिकारी के.बी.खडबडे, तलाठी कमलाकर तिडके, जाकेर कुरेशी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संबोधित केले की विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर दिला पाहिजे. सोशल मीडियाचा अती वापर टाळावा व एखाद्या विद्यार्थ्यांचे वडील शिक्षक असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडीलांपेक्षा पुढच्या पदावर कसे जाता येईल याचे प्रत्यन करावे. गावात शांतता टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पानगाव शहराला लागलेला कलंक सामाजिक कार्यक्रमानी पुसून काढायला सुरुवात झाली व पानगावात लवकरच पोलिस ठाणे व येथील चौकीस कर्मचारी वाढवून देण्याची ग्वाही दिली. मोहसिन शेख हे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने आपले ध्येय पुर्ण करावे परीस्थितीशी न घाबरता लढले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्याला संस्कृतीचे पालन केले पाहिजे. तसेच वीट भट्टी ते सीएचा प्रवास त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. यावेळी सर्व शाळेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जुनेद आतार यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा .प्रल्हाद डोंगरे यांनी तर आभार शादुल्ला आतार यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनेद आतार, खाजा शेख, शादुल्ला आतार,जलील आतार, खदिर आतार आदिनीं परीश्रम केले.


Comments

Top