HOME   व्हिडिओ न्यूज

नगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप

कामे होत नाहीत, सगळा प्रभाग अंधारात सचिन मस्के यांचा संताप


लातूर: लातूर महानगरपालिकेचा विद्युत विभाग अनेकदा विनंत्या करुनही प्रभागातली कामे करीत नाही. प्रभाग सातचा ७० ते ८० टक्के भाग पथदिवे नसल्याने अंधारात आहे. अंधारामुळे दोन तीन वृद्ध व्यक्ती खड्ड्यात पडल्या. दोन महिन्यांपासून विनंती करुनही केवळ कारणे सांगितली जातात याबाबत संताप व्यक्त करीत प्रभाग सातचे नगरसेवक सचिन मस्के यांनी मनपाच्या विद्युत विभागाला कुलूप घातले. काय व्हायचंय ते होऊ द्या पण कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कुलूप काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यावेळी नगरसेवक सचिन बंडापल्लेही उपस्थित होते. हा सारा प्रकार घडत असताना उपायुक्त येऊन फक्त आश्वासन देऊन गेले!


Comments

Top