लातूर: मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलीय. लातूर जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन आणि निदर्शने केली. लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यातली खास बाब अशी की आ. भिसे स्वत: या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं, महिलांना संरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं आणि शेतकर्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या घरासमोर हे आंदोलन झालं. त्यात स्वत: आ. भिसे सहभागी होते!
Comments