HOME   व्हिडिओ न्यूज

गुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार

महा आरोग्य शिबिरात अनेक रुग्णालयांचे योगदान


लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ०६ वा स्मृतीदिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा असोसिएशन, आ.डी.आय. असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन व विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहर व जिल्ह्यात मंगळवार, १४ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर येथील डॉ. एस. बी. गुगळे मेमोरियल हॉस्पिटल येथील पंचतंत्र व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. गुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार करण्यात आले. यात २२ एंडोस्कोपी, ०५ कोलोनोस्कोपी करण्यात आल्या. शिवाय १० जणांची रक्त, लघवी तपासण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, राष्ट्रवादी काँगेसचे मकरंद सावे, माजी नगरसेवक समद पटेल, नगरसेविका सपना किसवे, डॉ. दीपक गुगळे, डॉ. मेघना गुगळे, कुणाल वागज आदी उपस्थित होते.


Comments

Top