लातूर: या देशाला, राजकीय आणि सरकारी यंत्रणेला उभारणार्यांना, दलित-पिडीतांना न्याय देणार्या राज्यघटनेची दिल्लीत होळी करण्यात आली. यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले असून एमआयएम (अली) पक्षाचे अध्यक्ष अॅड. मोहम्मद अली यांच्यासह कार्यकर्त्यांनी सह्यांची मोहिम राबवली. दुपारी साडेचार वाजल्यापासून लोक सह्या करीत होते, निषेध नोंदवत होते. या प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत दोन हजारहून अधिक स्वाक्षर्या केल्या होत्या. या उपक्रमात
पक्षाध्यक्ष अॅड मुहम्मद अली शेख, सय्यद अज़हर, किरण लामतुरे, फरदीन खान पठाण, रईस शेख, शाहबाज़ शेख, खिज़र कुरेशी, समीर शेख, मोहसिन शेख, सय्यद रहीम, तौहीद बागवान, सय्यद साजिद, मुदस्सर पठान, शेख ताहेर, शेख इरफान(जन एकता संघटना) शेख सत्तार, शेख जावेद, समद शेख, उस्मान गुरुजी, उम्रदराज़ खान, सय्यद मुहम्मद गौस, मोहसिन खान, अजय सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष लोक प्रहार संघटना) विनय जाकते, (भीम राज युवा संघटना संस्था पक अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अजय ढगे, शेख इलाही, सय्यद शाहबाज़, व अन्य उपस्तिथ होते
Comments