लातूर: लातूर-मुंबई रेल्वे बिदरला गेल्यापासून समाजातील सर्वच घटकात नाराजी पसरली आहे. ही गाडी परत यावी यासाठी अनेक आंदोलनं झाली पण रेल्वे खाते जराही हलले नाही. इथले खासदार काय करतात, त्यांनी या गाडीला परवानगी कशी दिली असे भाबडे प्रश्न आजही विचारले जातात. हा रेल्वेचा विषय गरम होता त्यावेळी सोशल मिडियावरही मतांचा आणि प्रतिक्रियांचाही पआऊस पडत होता. त्यामुळे की काय खासदारंनीही या माध्यमाचा वापर करीत चॅटींग मध्ये भाग घेतला. आपण लातूर रेल्वे परत आणण्यासाठी काय काय प्रयत्न करीत आहोत याची माहिती, फोटो आणि व्हिडीओही सोशल मिडियावर टाकले. याचं पत्रकारांना जरा आश्चर्यच वाटलं. कारण खासदार स्वत: संपादक आहे. सगळ्याच पत्रकारांचे मित्र आहेत. त्यांच्यामार्फत आपली बातमी न देता ते सोशल मिडियाचा बातम्या प्रसारित करण्यासाठी का वापर करीत आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडत होता. परवा त्यांची पत्रकार परिषद होती. ती संपल्यावर आम्ही रेल्वेचा प्रश्न पुन्हा काढला, त्यांच्या सोशल मिडियाच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर ते हसले. आम्ही विचारलं, खासदारसाहेब तुम्हाला पत्रकारांवर भरोसा नाय का? ते म्हणाले असं काही नाही, मी स्वत: पत्रकार आहे, आपला आपल्यावर भरवसा असतोच, मी संपादक आहे, आपण एकाच परिवारातले आहोत, आपण सगळेजण मिळून प्रयत्न करु, लातुरची ट्रेन आणण्यासाठी आपण सारेजण माझ्यासोबत रहा, लातूर ट्रेन कशी येत नाही हे आपण बघू!
Comments