HOME   व्हिडिओ न्यूज

‘पद्मावती’ विरोधात लातुरात धरणे आंदोलन

इतिहासातील पात्रांना पडद्यावर नाचवण्याची संजय भन्साळीत विकृती!


लातूर: संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाच्या विरोधात लातुरातही वोरिध व्हायला सुरुवात झाली आहे. आज गांधी चौकात क्षत्रिय राजपूत महासभा, इतर राजपूत संघटना आणि हिंदू संघटनांनी धरणे आंदोलन केले. या चित्रटावर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. भन्साळी यांनी या चित्रपटात इतिहासाचं विद्रुपीकरण केलं आहे. राणी पद्मावतीला नृत्य करताना दाखवलं आहे. हे कदापिही मान्य नाही. भन्साळी आपल्या नावात आईचं नाव लावतात. आधी आम्हाला त्याचा अभिमान वाटला. आता त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव माहित नसावं म्हणून ते लावत नसावेत असं पृथ्वीसिंह बायस म्हणाले. या आंदोलनावेळी महाराणी पद्मावती आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. इतिहासातील पात्रांवर चित्रपट काढायचे आणि त्यातील स्त्री पात्रांना नाचताना दाखवायचं अशी विकृती भन्साळी यांच्यात असावी असं शिवासिंह सिसोदिया यांनी सांगितले. त्यांच्या या आधीच्या देवदास चित्रपटात प्रेयसी आणि नर्तिकेला एकत्र नाचताना दाखवलं, बाजीराव मस्तानीत मस्तानी आणि बाजीरावांची पत्नी काशीबाई यांना एकत्र नाचकाम करायला लावलं आता पद्मावती सिनेमात पद्मावतीलाही नाचताना दाखवलं ही विकृतीच आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्याचं अनुकरण करावं अशी मागणी पृथीसिंह बायस यांनी केली.
यावेळी रमेश बिसेन, प्रा. जोग्रेंद्रसिंह बिसेन, सुजित देशपांडे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्व हिंदु परिषद, धमेंद्रसिंह बिसेन, मनोज जोशी, अध्यक्ष ब्राम्हण महासभा, प्रकाश पांडे, श्रीकांत रांजणकर अध्यक्ष वीर योद्धा, विरेंद्रसिंह चौहाण, शेवराजसिंह गहेरवार, केदारसिंह चौहाण, सुशिल चौहाण, शिवसिंह शिसोदीया, संतोष ठाकूर, धमेंद्रसिंह बिसेन, सुनिल पवार, आशिष चंदेले, जनरलसिंह ठाकूर, सतिश ठाकूर, प्रतापसिंह बुंदेला, कपील तिवारी, चरण तिवारी, प्रणव रायचुरकर, किसन कदम, आकाश मसाने, रविसिंह परदेशी, संदीपान चोथवे, बजरंगसिंह ठाकूर, कुलदिपसिंह ठाकुर, प्रदीप गंगणे, गोपाळ बुरबुरे, प्रल्हाद नागिमे, प्रविण परदेशी, अर्जुन संदेले, वैभव मिश्रा, अक्षय चौहाण, नितीन चौहाण, संजयसिंह राजपूत, मेघराज बंडगर उपस्थित होते.


Comments

Top