HOME   व्हिडिओ न्यूज

दिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद

लातुरच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पण अप्रिय प्रकार नाही


लातूर: लातूर शहरात आज गणेश विसर्जन मिरवणूकांची धूम शहरातील प्रमुख रस्त्यांवर पहावयास मिळाली. ढोल-ताशांचा गजर आणि गणरायाच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकास सुरुवात झाली. आज सकाळपासून मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मानाचा आजोबा गणपती रत्नदीप आझाद गणेश मंडळ मार्गस्थ झाल्यानंतर इतर मंडळाच्या मिरवणूकाही मोठ्या उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात मार्गस्थ झाल्या आहेत. लातूर शहरात पाच ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनासह महानगरपालिकच्या वतीने जागोजागी बंदोबस्त करण्यात आला आहे. गांधी चौक, शिवाजी चौक, गंजगोलाई येथे मिरवणुका दाखल झाल्या. मंडळाचे देखावे पाहण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध संघटनांनी चहापानाची सोय केल्याचे दिसून आले. रात्री १२ पर्यंतच पारंपारिक वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. विना डॉल्बीची मिरवणूका निघाल्यामुळे तरूणात खंत जाणवली. अपारंपारिक वाद्य आणि गुलालाचा वापर टाळण्यावर गणेश मंडळांचा भर पहावयास मिळाला. अनेक ठिकाणी पुष्प्वृष्टी करण्यात आली. ढोल ताशांचा अधिक वापर करण्यात आला. यात मुलींचाही मोठा द्सहभाग पहावयास मिळाला. राजा गणपती आणि शहरातील ईतरही गणपतींच्या मिरवणुका उत्साहपूर्ण वातावरणात निघाल्या. शिवाजी चौकामध्ये गणेशाच्या स्वागतासाठी मंच उभारण्यात आला असून येणार्‍या गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येते आहे. सुभाष चौकातही असेच स्वागत मंच उभारण्यात आले आहेत.


Comments

Top