लातूर: त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव लातूर मधील लेबर कॉलनी येथील मनपा स्त्री रुग्णालय ला देण्यात यावे यासाठी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर महानगरपालिकेत मागणी केली होती. सगळ्या विषयांना मनपा सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येते परंतु त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या नावाला दूर केल जात आहे व त्यावर साधी चर्चा देखील होत नाही हि भावना सर्व आंबेडकरवादी विचारांच्या नागरीकांची झालेली आहे. ही मागणी कोण्या एका व्यक्तीची नाही तर तमाम समाजाची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वांची आहे. यामुळे ही मागणी डावलण्याचे काहीही कारण नसताना मनपातील मागील सहा महीन्यापासून सत्ताधारी याबाबत टाळाटाळ करीत आहेत. ही मागणी मान्य व्हावी यासाठीच दिनांक २५ सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले . यामध्ये सर्व संघटना, पक्षाची मंडळी उपस्थित होती. या मागणी आणी आंदोलनाची दखल घेत येता १५ दिवसा मध्ये महानगरपालिकेची विषेश सभा बोलावून ही मागणी तात्काळ मान्य करावी अन्यथा पूढील काळात या मागणी साठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला.
आपण सर्वजण या आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या एकदिवसीय धरणे आंदोलनात प्रथमच लातूरातील आंबेडकरवादी विचारांचे सर्व नेते कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सर्व पक्ष, संघटनांचे पांठीबा पत्र आंदोलन स्थळी तीन मुली स्वीकारत होत्या. आंदोलनाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करुन करण्यात आला. यावेळी महिलांची संख्या सर्वाधिक होती. आंदोलनानंतर महापौर यांना निवेदन देण्यास गेले असता महापौर उपस्थीत नसल्याने निवेदन त्यांच्या कक्षाच्या दारास अडकविण्यात आले व उपायुक्त यांना याची प्रत देण्यात आली निवेदनावर उपस्थीतांच्या व शेकडो नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत.
Comments