HOME   व्हिडिओ न्यूज

जावळीत शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाचा व्याप वाढल्याने उचलले पाऊल, विषारी औषध प्राशन


लातूर: सरकारने कर्जमाफीची घोषणा करुनही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. आज पहाटे जावळीतील अंबादास बळी आळणे यांचा मृतदेह जावळी येथील शेतात सापडला. औसा तालुक्यातील या गावात अंबादास यांची दोन एकर शेती आहे. शेतीसाठी आणि मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर त्यांचा डोक्यावर होता. यात बॅंकेच्या आणि खाजगी कर्जाचाही समावेश आहे. अंबादास यांच्या पश्चात पत्नी आणि विवाहित मुलगी आहे. सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने अंबादास यांनी पिकवलेले सोयाबीन घरातच ठेवले होते.


Comments

Top