लातूर: लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने लवकरच संपूर्ण शहरात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. याच निधीमधून आज प्रभाग क्रमांक ०१ मध्ये ४० लाखांच्या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. आजम चौक भागातील रस्त्याचे भुमीपुजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. भाजपाला ज्या विश्वासाने जनतेने काम करण्याची संधी दिली आहे ती सार्थ ठरवण्यास आम्ही सारे नगरसेवक बांधील आहोत असे स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे म्हणाले. या कामाचे उद्घाटन प्रभागातील जेष्ठ नागरीक अहेमद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे. उपमहापौर देविदास काळे, नगरसेविका समिना शेख, खय्युम शेख, आतिफ सय्यद, सचिन भुमकर, आकाश बाभळे व प्रभागातील बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.
Comments