HOME   व्हिडिओ न्यूज

जनता मारते अधिकारी चौकशीही करीत नाहीत

पंगा कसा घ्यायचा? कॉन्स्टेबलला आला तोच अनुभव दोनदा!


लातूर: लातुरच्या पोलिस विभागात काम करणार्‍या एका कॉन्स्टेबलवर दोन वेळा दुर्दैवी प्रसंग आला. दोन्हीवेळा वरिष्ठांनी कसलीच आस्था दाखवली नाही. शांतता राखण्यासाठी प्रयत्न करताना रामचंद्र ढगे या कॉन्स्टेबलवर दोनदा हल्ला झाला. ते शिवाजीनगर ठाण्यात कामावर असताना धिंगाणा घालणार्‍या एका माथेफिरुने ढगे यांच्या डोक्यात दगड घातले ते अश्विनी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या डिपार्टमेंट्च्या कुणाही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. संपादक रवींद्र जगताप यांनी उपोषणाची धमकी दिल्यावर बडे अधिकारी बळे बळे येऊन गेले. काल असाच प्रकार घडला. भोईवाडा आणि इंदिरानगरच्या नागरिकात तणाव निर्माण झाला. काठ्या, लाठ्या आणि तलवारीसह ते भिडले. ढगे यांनी तणाव कमी केला. पण मधेच दगडफेक सुरु झाली. त्यात ढगे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. सात टाके पडले. ते विवेकानंद रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. पण कुणाही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. त्यांची चौकशीही करायला कुणी आले नाही.


Comments

Top