लातूर: लातूर जिल्ह्यात आज विजयादशमीच्या मुहुर्तावर पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयाचे उदघाटन प्रलंबित होते मात्र आज सिमोल्लंघनाच्या दिवशी ही सुविधा सुरु करण्यात आली. या पूर्वी पासपोर्ट्साठी नागपूरला जावे लागायचे पण आता ही सुविधा लातूर शहरात चालू झाल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे असे खा. सुनील गायकवाड म्हणाले. या सुविधेचा उपयोग जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खा. गायकवाडांनी केले. या कार्यालयात पहिल्या टप्प्यात २५ कर्मचारी काम करतील जसा जसा लोकांचा प्रतिसाद वाढेल तसे कर्मचारी संख्या वाढवण्यात येईल. पासपोर्ट्ची पडताळणी सुविधा व एका आठवड्याच्या आत करुन पासपोर्ट मिळू शकेल. या उदघाटन समयी खा. सुनिल गायकवाड, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, महापौर सुरेश पवार, पासपोर्ट ऑफीसर आनंद ताकवले, बालाजी पाटील चाकुरकर, संतोष गिल्डा उपस्थित होते.
Comments