लातूर: आज ‘संविधान दिन’, याच दिवशी राज्य घटनेचा अंतिम मसुदा स्वीकारला गेला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभा निर्मिती समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी संविधान-घटना देशाला अर्पित केली होती. आज या निमित्ताने लातूर शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले. कॉंग्रेसच्या कॉंग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाने गांधी चौक ते आंबेडकर अशी रॅली काढली. गांधी चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. रॅलीने आंबेडकर पार्क येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महात्मा गांधींनाही अभिवादन केले. रॅली निघण्यापूर्वी २६/११ च्या घटनेत मरण पावलेल्या व्यक्ती आणि शहिदांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहराध्यक्ष रत्नदीप अजनीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत कॉंग्रेसचे मोईज शेख, दत्तात्रय बनसोडे, अॅड. सचिन कांबळे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट, कैलास कांबळे, शामराव सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, लक्ष्मण कांबळे, बाबासाहेब गायकवाड, बालाजी कांबळे, सहदेव मस्के, अभिजित ओहळ, शाम कांबळे, हरिश कांबळे, राजू गवळी, रवी गायकवाड, कमलाकर सुरवसे, मिलिंद श्रीमाने, भाऊसाहेब गायकवाड, दयानंद कांबळे, प्रितीश सुरवसे, सोमेन वाघमारे सहभागी झाले होते.
आंबेडकर चौकातही रॅलीचे अभिवादन
भारिप-बहुजन महासंघ, भीम टायगर, वैशाली युवक मित्रमंडळानेही संविधान रॅली काढली. आंबेडकर चौकात रॅलीतील सहभागी व्यक्तींनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. घटनेचे महात्म्य आणि पावित्र्य राखण्याची शपथ घेतली. या रॅलीत विजय बनसोडे, राजेंद्र कांबळे, अतुल सुरवसे, रमक जोगदंड, गौतम सोनवणे, अजय हिरके, गणेश कांबळे, कुणाल कांबळे, जीवन कांबळे, अनिल इंगळे यांच्यासह शोकडोजण सहभागी झाले होते.
Comments