HOME   व्हिडिओ न्यूज

न्या. लोया मृत्यूप्रकरणी वकिलांचा मोर्चा

समिती नेमून पुन्हा चौकशी करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी


लातूर: लातूर वकील मंडळाचे सदस्य, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती स्व. ब्रिजमोहन लोया यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी लातुरच्या वकील मंडळाने केली आहे. यासाठी वकिलांनी आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. एक डिसेंबर २०१४ रोजी यांचा मृत्यू नागपुरात झाला होता. त्यावेळी घडलेल्या घटनांवरुन तो संशयास्पद वाटतो. त्यावेळी याबद्दल कुणी बोललं नाही पण त्यांच्या भगिनींनी पुढाकार घेऊन माध्यमांना याबाबतची माहिती दिली होती. हा खून केवळ लोयांचा नाही, सबंध न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचा खून आहे. त्यांच्या खुनामागे बड्या हस्तींचा हात आहे. लोयांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न झाला होता पण त्यांनी ते नाकारले होते. त्यांच्या मृत्यूची न्यायिक चौकशी व्हावी, त्यासाठी समिती नेमावी, यातले सत्य बाहेर आले पाहिजे. न्यायालयीन यंत्रणेवर होणारा हा आघात हाणून पाडल पाहिजे अन्यथा लोकशाही संपायला वेळ लागणार नाही, राज्यातील सगळ्या जिल्हा वकील मंडळांनाही अशाच प्रकारची मागणी करण्यासाठी पत्रे पाठवली आहेत. या खुनामागचे हात लोकांसमोर आले पाहिजेत असे लातूर वकील मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील म्हणाले. यावेळी उदय गवारे, प्रदीपसिंह गंगणे, अजय कलशेट्टी, नयना देवताळकर, शरद इंगळे, संदीप औसेकर, तेजस्वी जाधव, अभिजित मगर आणि अन्य वकील उपस्थित होते.


Comments

Top