HOME   व्हिडिओ न्यूज

पुरावे द्या गुन्हा कबूल करेन- डॉ. गिरीश ठाकूर

लाय डिटेक्टर टेस्टला तयार, सगळा स्टाफ, विद्यार्थी माझ्या पाठीशी


लातूर: लातुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तथाकथित विनयभंगाचं प्रकरण सध्या गाजत आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थीनीने माध्यमांसमोर आरोप केल्यानंतर संबंधित डॉक्टर गिरीश ठाकूर यांची भेट घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. ते मुंबईत होते. तेथूनच त्यांनी स्वत:ची भूमिका सांगणारी एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियाद्वारे पाठवली होती. आज ते लातुरात दाखल झाले. त्यांनी आजलातूरसमोर पत्नीसमक्ष आपलं म्हणणं मांडलं. यावेळी डॉक्टरांनी विनयभंगाचा आरोप साफ खोटा आणि चुकीचा असल्याचं सांगितलं. मी दीड वर्षापासून विनयभंग करीत असेन तर ही विद्यार्थीनी कोर्टात पुरावे देईलच. त्याआधी तिने हे पुरावे पोलिसांना द्यावेत किंवा सोशल मिडियावर द्यावेत. पुरावे दिले तर मी स्वत:च गुन्हा कबूल करेन. महाविद्यालयाच्या शस्त्रक्रियागारातून तीन यंत्रे चोरीला गेली. त्या ठिकाणाहून बाहेर पडणाची शेवटची व्यक्ती तीच होती. तिच्या हातात मोठी बॅग होती. यामुळे तिच्यावर संशय निर्माण झाला. या प्रकरणी एफआयआरही दाखल झाला आहे. ती कुठल्यातरी भितीपोटी हे बोलत असावी. महाविद्यालयाच्या उभारणीपासून मी इथे आहे. आमचं गुरु शिष्याचं नातं आहे. आजवर कुणीही माझ्यावर असला आरोप केला नाही. मी तिला एकटा भेटत असेन तर आमचे टॉवर लोकेशन एक येऊ शकतात, त्याची तपासणी करावी, तिने फोन रेकॉर्डींग्ज द्यावेत असं आव्हान डॉ. ठाकुरांनी दिलं. अशा प्रकारांमुळं माझी, संस्थेची बदनामी होते. लाय डिटेक्टर टेस्टलाही मी तयार आहे. सगळा स्टाफ, विद्यार्थी माझ्या पाठीशी आहेत असाही दावा डॉक्टरांनी केला.


Comments

Top