HOME   व्हिडिओ न्यूज

अतिरिक्त शिक्षकांचे एसएससी बोर्डासमोर धरणे, निदर्शने

जिल्ह्यातच समायोजन करावे, विभागीय पातळीवरील समायोजनाला विरोध


लातूर: शाळा, शिक्षण विभाग आणि शिक्षक या सर्वांसाठी अतिरिक्त शिक्षक ही एक डोकेदुखी बनली आहे. शिक्षण विभागाने एखाद्या शिक्षकाचे समायोजन करण्याचे पत्र दिले की संस्थाचालक पैसे मागतात किंवा जागाच शिल्लक नाही असं सांगतात. शिक्षक नसलेल्या ठिकाणी लाखांचा मलिदा लाटणे हा त्यांचा उद्देश असतो. एवढेच काय तर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातही समायोजन केले जात नाही. अशा अनेक शाळातील अनुभव अनेक शिक्षक सांगत असतात. यावर उपाय म्हणून विभागीय स्तरावर शिक्षकांवर अन्याय होऊ शकतो. आमचे समायोजन आमच्याच जिल्ह्यात कुठेही करावे, आम्ही काम करण्यास तयार आहोत. आमचा विभागीय समायोजनाला विरोध आहे, आम्ही त्यात सहभागी होणार नाही असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.


Comments

Top