HOME   व्हिडिओ न्यूज

देशातील सर्वात शक्तीमान मनोज चोप्रांकडून व्यसनविरोधी जागृती


नाव मनोजकुमार चोप्रा, उंची सहा फूट पाच इंच, वजन १७० किलो. भारत आणि आशियातील सर्वात बलवान व्यक्ती. जगात १४ व्या क्रमांकावर. गिनिज बुकात नोंद, शाळा आणि महाविद्यालयातून नशापाणी आणि धुम्रपानाच्या विरोधात जागृती करण्याचा उपक्रम राबवतात. बेंजामीन दुप्ते यांच्या ओळखीने ते लातुरात आले. त्यांची पत्रकार परिषद झाली. चोप्रा यांनी एका दमात टेलीफोन डिरेक्टरी फाडून दाखवला, स्वयंपाकात वापरतात तो फ्राय पॅनही तोडला. ताकदीचे अनेक प्रयोग करुन दाखवतात. कारही लिलया उचलतात. या पंजाबी माणसाला साधंच जेवण आवडतं. छत्तीसगड आणि बंगलोरमध्ये त्यांना भीम म्हटले जाते. तरुणांना सन्मान आणि दृष्टी दिली तर परिवर्तन घडू शकते असा विश्वास ते व्यक्त करतात. त्यांनी तीन हजारहून शाळातून प्रबोधन केले आहे. लातुरातही अनेक शाळातून त्यांनी संस्कृती संवर्धनाचा आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला. आपल्या ताकदीमुळे अनेकवेळा परदेशवारी केलेल्या मनोजकुमारांचे अनेक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय चॅनल्सवर झाले आहेत. लातुरच्या पत्रकार परिषदेत मनोजकुमार यांनी अनेक ताकदीचे प्रयोग करुन दाखवले.


Comments

Top