लातूर: यंदा २०१६ पेक्षा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची भिती व्यक्त आहे. या स्थितीत पालकमंत्री संभाजी पाटील यांनी टंचाईशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. सबंध जिल्हा आता दुष्काळी झाला आहे. दुष्काळ निवारणासाठी जे जे करता येईल या सगळ्या उपाय योजना करु असं पालकमंत्री म्हणाले. अलीकडेच या संदर्भात जिल्हास्तरीय बैठक झाली. आमदारांनी तालुका स्तरावर बैठका घेतल्या. १५ जानेवारी नंतरही अशीच बैठक घेऊन टंचाई निवारणाचे उपाय केले जातील. ज्या गावातून टॅंकरची आगणी होईल त्या सर्व ठ्गिकाणी ही व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहितीही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
Comments