लातूर: लातुरचं भूषण असणार्या, मुख्य बाजारपेठ म्हणून गणल्या जाणार्या गंजगोलाईत संध्याकाळी सहज चालत जायचा प्रयत्न यशस्वी होत नाही. ९०-९५ फुटी या रस्त्यावरुन एक बसही जाणे मुश्कील ठरते. हातगाडेवाले आणि छोटे बैठे व्यावसायिक सरळ रस्त्यावरच असतात. दुचाक्याही रस्त्यावरच विश्राम करीत असतात. या वाहनांच्या गर्दीत टोईंग वाहनही असते. ते काहीच करु शकत नाही. जिल्हाधिकार्यांनी गोलाई रिकामी केली खरी पण पुढची व्यवस्था होऊ शकली नाही. अतिक्रमण निर्मूलन विभागाची गाडी चार कर्मचारी घेऊन केवळ धमकावत फिरते. त्याचा कुणालाच काही वाटत नाही.
Comments