लातूर: याच समाजात राहणारा चर्मकार पण दूर्लक्षित समाज गणला जातो. समाज व्यवस्थेत आपले काम निमूटपणे करणारा शांत समाज. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आर्यन सेनेच्यावतीने अविराजे निंबाळकर करीत आहेत. या निमित्ताने त्यांनी चर्मकार वधू-वरांच्या परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात ३२५ वधू-वरांनी सहभाग नोंदवला. मेळाव्याचे उदघाटन डॉ. महेंद्र सोनवणे यांनी केले. पंचायत समितीचे गटनेते रमेश सोनवणे यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुमित वाघमारे, सल्लागार नवनाथ गायकवाड, महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर, प्रदीप गंगणे उपस्थित होते. सूत्र संचलन प्रवीण नाबदे यांनी केले. प्रास्ताविक अनिल वेरेकर यांनी केले. पंकज मगर यांनी आभार मानले.
आर्यन सेनेच्या वतीने अशाच सनमाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लवकरच सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर यांनी दिली. या मेळाव्यासाठी बिभीषण सांगवीकर, रवी कुरील, संघटनेचे उपाध्यक्ष अनिल वेरेकर, सचिव दीपक कांबळे, जिल्हाप्रमुख महेश जाधव, खांडू मगर, राहूल कांबळे, तानाजी निंबाळकर, नितीन माने, अंकुश कांबळे, अविनाश मगर, महेश हणमंते, खंडू बनसोडे, रवी भावले, सोनाली टिळे, योगेश जाधव, आनंद वाघमारे, माधव सूर्यवंशी, गोविंद कांबळे, सोपान सातपुते, ज्ञानोबा सातपुते, विशाल गायकवाड, सूरज नागटिळक, समीर शेख, शुभम शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
Comments