HOME   व्हिडिओ न्यूज

शिवसैनिकांनी बंद पाडलं इंजिनिअरींग कॉलेज

दोषी प्राध्यापकांना तातडीने काढून टाकण्याची मागणी


लातूर: विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनात दोष आढळल्याने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाकडे दाद मागण्यात आली होती. यात लातुरच्या एमएस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. एनबी खटोड, प्रा. आरएस खंडेलवाल आणि शुभांगी कवठाळे यांच्याबाबत एक समिती नेमून चौकशी केली. त्यात हे तिघेही दोषी आढळून आले. यापुढे परिक्षेच्या कामातून पुढच्या पाच वर्षांसाठी त्यांना प्रतिबंधित करण्य़ात आले होते. पण हे तिघेजणही महविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात रुजू आहेत. या तिघांनाही तातडीने काढून टाकावे या मागणीसाठीलातूर युवा सेनेने सिनेट सदस्य सूरज दामरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात जाब विचारला. विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज कॉलेज चालू शकले नाही. सध्या संस्थेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने ‘स्टेटस को’ दिला आहे अशी माहिती मन्मथप्पा लोखंडे यांनी दिली. यावेळी कुलदीप सूर्यवंशी, अ‍ॅड राहूल मातोळकर, सौरभ बुरबुरे, संतोष माने, आकाश मसाने, विजय थाडगे, रवी पिचारे, रोहित रोडे, स्वप्नील बेडगे उपस्थित होते.


Comments

Top