लातूर: एकीकडे बोगस तुकड्यांचा प्रश्न गाजत असतानाच विना अनुदानित तुकड्य़ांना शिकवणार्या शिक्षकांनी आज आंदोलन केलं. शिक्षण उप संचालक कार्यालयासमोरे या शिक्षकांनी धरणे धरले. नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या आणि अतिरिक्त तुकड्यांना अजुनही अनुदान दिले जात नाही. त्यामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत. शासन निर्णयाप्रमाणे २०१२ मध्ये अनुदानित शाळांना ५९७३ तुकड्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर चार वर्षांनी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाणार होते. आजवर चाळीस टक्के अनुदान मिळायला हवे होते. या तुकड्यांचे मुल्यांकन अनेकदा झाले आहे. वेगवेगळ्या पोर्टलवर सातत्याने माहिती दिली जात आहे. सहा वर्षांपासून हे शिक्षक विना वेतन काम करीत आहेत. सगळे शिक्षक अत्यंत अडचणीत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला जाईल, शाळा बंद ठेवल्या जातील असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
Comments