HOME   व्हिडिओ न्यूज

शाहूचा अनोखा प्रजासत्ताक दिन, विद्यार्थ्यांचं कला कौशल्य

विविध वेशभूषा, नृत्य, किर्तन, मूक अभिनय, एनसीसीचं संचलन


लातूर: केवळ सरकारी ध्वजारोहणावेळीच सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ राजपथावर विविधतेने नटलेली संस्कृती दाखवतात. राजर्षी शाहू महाविद्यालयाने मात्र नुसते ध्वजारोहण करण्यापेक्षा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. एनसीसीचं संचलन, मूक अभिनय, किर्तन असे अनेक कला प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांनाही वाव दिला जातो. दिल्लीतील संचलनात प्रत्येकाला संधी मिळत नाही. मग त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रजासत्ताक दिनी असे कार्यक्रम सादर केले जातील असे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी सांगितले.


Comments

Top