HOME   व्हिडिओ न्यूज

येवलेंच्या चहात असं आहे तरी काय?

येवलेंनी शोधला खास मसाला, महाराष्ट्रभर तीच चव!


लातूर: आपल्या शहरात चहासाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. असं असूनही काल परवा सुरु झालेल्या येवलेंच्या चहाला प्रचंड मागणी आली आहे. सकाळी उघडल्यापसून्रात्रीपर्यंत चहाचं हे दुकान गिर्‍हाईकांची गर्दी असते. या चहात इतर ठिकाणच्या प्रसिद्ध चहापेक्षा वेगळं काय आहे? येवलेंनी चहावर अनंत प्रयोग केले. त्यासाठी संशोधन करुन खास मसाला तयार केला. त्याच्या पुण्यात अनेक शाखा आहे. लातुरची शाखा ऋषिकेश कुलकर्णी चालवायला घेतली आहे. कुलकर्णींच्या राज्यात ४८ शाखा आहेत. तेच दूध, तीच सल्फरमुक्त साखर आणि तेच पण त्यातला मसाला मात्र वेगळा आहे. येवलेंच्या प्रत्येक शाखेला हाच मसाला, तेवढंच दूध, ठरलेलं पाण्याचं प्रमाण सांभाळावं लागतं. लातुरकरांचा येवलेंच्या चहाला जोरदार प्रतिसाद मिळतोय.


Comments

Top