HOME   व्हिडिओ न्यूज

चारा गेला गगनावरी!

चार्‍याचं धोरण ठरेना, शेतकरी स्वस्थ बसेना


लातूर: सबंध राज्यात दुष्काळ आहे. काही भागात तर अधिक तीव्र आहे. अशा अवस्थेत शेती तर हातची गेलीच. पण पदोपदी कामाला येणारी चार पैसे मिळवून देणारी जनावरेही कशी जगवायची असा प्रश्न पडला आहे. चारा छावणीला द्यायचा की दावणीला द्यायचा की शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करायचे हे काही ठरत नाही. या दरम्यान हवालदिल झालेले शेतकरी जनावरे मिळेल त्या भावाने विकत आहेत. लातुरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चारा विक्रीचा व्यवसाय चालतो. चारा घेऊन येणारे आणि विकणारे काय सांगतात बघा. सध्या मकवणाच्या (मक्याच्या) पेंढीचा भाव २५ रुपये तर ऊसाच्या वाड्याची पेंढी दहा रुपयांना मिळतेय.


Comments

Top