लातूर: लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. जवळपास सगळ्याच आघाड्या आणि युत्या होत आल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारांचाही विचार एक होत आला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मतदार संघातला उमेदवार कोण याच्या चर्चा सुरु आहेत उत्सुकता वाढत आहे. वंचित विकास आघाडीने आपला लातुरचा उमेदवार घोषित केला आहे. माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांची उमेदवारी त्यांनी घोषित केली. गारकर निलंगा तालुक्यातले आहेत. त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
ओवेसी आणि आंबेडकरांची संयुक्त सभा घोषित करण्यात आली होती. पण ओवेसी आले नाहीत. दरम्यान आंबेडकरांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष विधिज्ञ अण्णाराव पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. टाऊन हॉलच्या जाहीर सभेत महाराष्ट्र आघाडीने वंचित विकास आघाडीला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.
यावेळी अफजल कुरेशी, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, प्रा. सुभाष भिंगे, अजिंक्य चांदणे, अर्जून सलगर, अविनाश बर्वे, मंचकराव डोणे उपस्थित होते. सबंध मैदान गर्दीने खचाखच भरले होते.
Comments