लातूर: लातूर शहरातील चौकाचौकातील सिग्नल व्यवस्थेचा ‘चांगला’ अनुभव सगळ्यांनाच आहे. त्यातल्या त्यात दयानंद गेट आणि हनुमान चौकातील सिग्नल व्यवस्था वाहतूक नियमन बरे आहे. इथे गुंडीले नामक हवालदार चौकाची रखवाली करतात. आज सकाळी ११ वाजंयाच्या सुमारास नांदेड पासिंगच्या एका कारने सिग्नल तोडला. लगेच गुंडीले यांनी त्यांची गाडी बाजुला घेऊन पावती फाडली. फाडलेली पावती घेऊन कारवाला निवांत बसला पण पैसे द्यायला तयार नव्हता. दोघांनी बरीच हुज्जत घातली. लोकांची करमणूक झाली. अखेर कारवाल्याने पैसे देऊन सुटका करुन घेतली. बघा हा तमाशा......
Comments