लातूर: लष्कर जेवढी जोखीम स्विकारतं तेवढी जोखीम कुणावरच नसते. परवा पुलवामात आत्मघातकी अतिरेक्यांनी आपल्या ४० जवानांचे प्राण घेतले. त्याचा मोठा संताप देशभर उसळला आहे. लातुरातही बंद पाळला गेला. आज आपण भेटतोय कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सैनिक श्रीमंत गोरे यांना. काय चालतं सीमेवर, कसा असतो दबाव, काय असते जोखीम, कसे हल्ले होतात. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कशी परवानगी घ्यावी लागते, तोवर काय घडतं? ऐकुया-पाहुया. कालच पंतप्रधानांनी सैनिकांचे हात मोकळे केले. पाकिस्तानी कारवाया रोखण्यासाठी काय करता येईल? पाहुया मुलाखत....
Comments