HOME   व्हिडिओ न्यूज

एटीएम केंद्र फोडले, मशीन बाहेर पण पैसे तसेच!

कन्हेरी चौकातील प्रकार, यापूर्वीही घडली होती अशीच घटना


लातूर: लातुरच्या रिंग रोडवरील कन्हेरी चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र चोरट्यांनी फोडले. चोरी करताना सगळ्या वायरी तोडून टाकल्या. पैसे काढण्याचा खटाटोप केला. पण जमले नाही. मग त्यांनी हे मशीन केंद्राबाहेर आणून टाकले. पुन्हा फोडण्याचा प्रयत्न केला असावा तो काही सफल झाला नाही. अखेर त्यांनी ते मशीन बाहेर रस्त्याच्या कडेला आणून टाकले आणि पोबारा केला असावा. याच मार्गावर असाच एक प्रयत्न दोन वर्षांपूर्वी झाला होता. घटना कळताच एसबीआयचे अधिकारी चेतन भिसे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना याची खबर दिली. पंचनामा आणि बाकीच्या प्रक्रिया बाकी आहेत.


Comments

Top