लातूर: लातूर शहरामधील कोल्हेनगर भागात शिवजयंती निमित्ताने सर्वरोग निदान शिबीर आयोजित आले आहे. शिवभक्त प्रतिष्ठान आणि न्यू लाईफ फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन केले गेले आहे. यामधून समाजात शिवजयंतीच्या माध्यमातून मधून एकच सेवेचा धर्म पाळण्यात यावा हा संदेश समाजात जाणे गरजेचे आहे. दुष्काळाचे सावट असलेल्या लातूर जिल्ह्यात रोजगार करणार्या वर्गाकडे उपजिविका भागवण्याचा प्रश्न आहे. यामुळे या वंचित वर्गाकडे रुग्णालयात जाण्यास कुठून पैसे येणार? यामुळे या शिबीराचे आयोजन केल्याचे आकाश गायकवाड यांनी सांगितले. या शिबिराचा पहिला टप्पा आज पार पडला. त्यामध्ये सर्व त–Ö डॉक्टरांची टीम बोलावण्यात आली आहे. यामधून शहराच्या पूर्व भागात राहणारा एक वर्ग हा बहुतांश प्रमाणात वंचित आहे. या वर्गाला मदत करण्याची शिकवण शिवाजी महारांजानी आपल्याला दिली आहे. यामुळे हा विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे असे गायकवाड म्हणाले. उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ २५० रुग्णांनी घेतला आहे.
Comments