लातूर: सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात लौकिक प्राप्त करणार्या लातुरने मोटारसायकल रॅलीचं रेकॉर्ड केलं. सिद्धेश्वर मंदिरच्या प्रांगणातून निघालेली ही रॅली ‘आपण सर्वजण’ने आयोजित केली होती. यावेळी कसलंही आवाहन न करता हा प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर मंदीर ते नवीन रेणापूर नाका, शिवाजी चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, गंजगोलाई, पुन्हा गांधी चौक ते शिवाजी चौक असा मार्ग होता. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली.
Comments