लातूर: आज शिवरात्री. त्यात शिवाचा वार सोमवार. या सोमशिवरात्रीने भाविकांना महादेव मंदिरानं खेचून आणलं. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोटारसायकली. त्यातून वाट काढणार्या चारचाकी. पायी जाणारी तेवढीच माणसं. हे सगळं चित्र आज तळ्यातल्या महादेव मंदिराचं आणि आसपासचं आहे. ज्यांना मंदिरात जाणे शक्य नव्हते त्यांनी बाहेरुनच हात जोडले. बसवेश्वर महाविद्यालयापासून रमापर्यंत यायला तीस मिनिटं लागली!
Comments