लातूर: लोकसभेचे पडघम राज्यात दिसून येत आहेत याच अनुषंगाने आज महायुतीचा घटक पक्ष असलेल्या दलीत महासंघाचे मच्छींद्र सकटे यांनी लातूर येथे पत्रकार परिषद घेवून या सरकारने सर्व घटकांना नाराज केले आहे. या सरकारची ध्येय धोरणे ही संविधानाचा अपमान करणारी आहेत यामुळे यावेळच्या निवडणुकीत या सरकारला पाय उतार करण्याची वेळ आली आहे असे आवाहन सकटे यांनी केले. देशातील सर्व यंत्रणामध्ये हस्तक्षेप करून त्या यंत्रणांना कमजोर केले आहे. मोदी यांनी मेक इन इंडीयाची घोषणा केली मात्र या योजने अंतर्गत झालेले कामे ही परदेशातून आयात करण्यात आली यामुळे ही योजना ‘फेक इन इंडीया’ आहे असा घणाघाती आरोप यावेळी सकटे यांनी केला. मोदींनी देशातील जनतेशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला खरा पण देशात या सरकारच्या काळात १५४ दलितांची हत्या करण्यात आली यावर मात्र ते कधीच बोलले नाहीत. या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसने आपल्या प्रचार गिताचे अनावरण केले. यावेळी आ. अमित देशमुख, मोईज शेख, व्यंकट बेद्रे, एस. आर देशमुख, मकरंद सावे, अशोक गोविंदपूरकर, अॅड. हिप्परकर, दिपक सूळ, अभय साळुंके, माजी महापौर स्मिता खानापुरे, विक्रांत गोजमगुंडे उपस्थित होते.
Comments