HOME   व्हिडिओ न्यूज

इंदू मिल स्मारकासाठी पॅंथरचे धरणे

स्मारकासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी


लातूर: मंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक त्वरीत उभारणी करण्यात यावे यासाठी गांधी चौक येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ऐन
निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी या स्मारकाची घोषणा केली होती. १२५ व्या शतकोत्‍तर रौप्य महोत्सवी वर्षी मुंबईस्थित इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भुमीपुजनही केले. केंद्र शासनाने उभारणीचे अधिकारही वर्ग केले. मात्र निष्क्रीय सरकारने स्मारक उभारणीसाठी पुतळ्याचा खर्च ३५०० कोटी असतानाही शासनाने ९०० कोटी रूपयाचा निधी दिला आहे. हा निधी हास्यास्पद व अपुरा आहे. यासाठीच बाबासाहेबांच्या स्मारकासाठी कुठलाच ठेकेदार निविदा भरायला तयार नाही. राज्य शासनाकडे स्मारकासाठी कसलाच कृती आराखडा तयार नाही. ईंदू मिलवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी ५००० कोटी करावा, स्मारकाच्या कामास तात्काळ सुरूवात करावी, ३५० फूट उंच पुतळ्याला तात्काळ मंजूरी द्दावी, राज्य शासनाने तात्काळ मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी कृती आराखडा मंजुरीचे आदेश द्यावेत, स्मारकाचे मॉडेल राज्य शासनाने ३० दिवसाच्या आत मंजूर करून प्रकाशित करावे, बाबासाहेब यांचे दुर्मीळ ग्रंथ तथा अप्रकाशित ग्रंथ राज्य शासनाने प्रकाशित करावेत या मागण्य़ांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र अंदोलन करण्य़ात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी संतोष वाघमारे, पांडूभाऊ वेदे, प्रताप कांबळे, अ‍ॅड. राहूल कांबळे, भैय्यासाहेब वाघमारे, नितीन समुद्रे, लखन धावारे, दिलीप मोरे, विक्रम बनसोडे, विक्रम गायकवाड विकास कांबळे आदी उपस्थित होते.


Comments

Top