HOME   व्हिडिओ न्यूज

अडीच तास ट्राफीक जाम, दोन गाड्यांमुळे

एक अंबाजोगाईची अन दुसरी लातुरची, दोन्ही गाड्या नेल्या ओढून!


लातूर: आज अक्षयतृतिया, सराफ लाईनला गर्दी. त्यात अंबाजोगाईहून आलेली मोठी कार आणि दुसरी लातुरची कार या दोन्ही कारने रस्ता अडवला. अनेकांनी या वाहनचालकांचा शोध घेतला पण कुणीच सापडले नाहीत. संतापलेल्या नगरिकांनी या दोन्ही वाहनांच्या टायरमधली हवा सोडून दिली. त्यात दोन सिटी बस आल्या. त्या अडकून बसल्या त्यांच्या मागची सगळी ट्राफीक झाली. गंजगोलाई, गुळ मार्केट, गांधी चौक आणि अशोक हॉटेल! अडीच तास हा खेळ सुरु होता. पोलिस आपल्या पद्धतीने आए. टोईंग वाहनं त्यांच्या पद्धतीनं आली. दोन्ही गाड्या ओढून नेल्या गेल्या. मग तासभर तुंबलेल्या गाड्यांचं रस्त्यावरुन वाहणं सुरु झालं. बघा हा रिपोर्ट.....


Comments

Top