लातूर: काही वर्षांपूर्वी मोबाईल येऊनही क्वाईन बॉक्स फोनचा मोठ्या प्रमाणावर वार व्हायचा. आता मोबाईलवर बोलणे अतिशय स्वस्त झाले आहे. किंबहुणा मोफतच झाले आहे. त्यामुळे क्वाईन बॉक्स फोन सहसा दिसत नाहीत. पण लातुरच्या गंजगोलाईत इलमचंदच्या दुकानाशेजारी एका हातगाडीवर तीन क्वाईन बॉक्स पहायला मिळतात. लोकही त्याचा भरपूर उपयोग करतात. ग्रामस्थांसह शहरी मंडळीही त्याचा वापर करतात. पण हे क्वाईन बॉक्स वायरलेस आहेत. त्यात सीमकार्ड आहेत आणि चार्जिंगची बॅटरीही आहे. थोडक्यात हा एक प्रकारचा मोबाईलच आहे!
Comments