लातूर (आलानेप्र): सध्या कर्जमाफीचे, शेतकरी आंदोलनाचे, खुर्च्यांच्या लिलावाचे दिवस आहेत. या विषयावरुन विधानसभेत गदारोळाचे दिवस आहेत. या पार्श्वभूमीवर आज लातुरात वेगळाच गोंधळ पहायला मिळाला. बारावीच्या विद्यार्थ्याला चक्क कर्जमाफीचा मेसेज आला. इतकंच नाही तर जुन्या बॅलन्ससह ११ हजार ३५४ ही एकूण रक्कमही त्यात नमूद करण्यात आलीय. हा प्रज्वल जाधव बारावीत नेटीझन्स कॉलेजात शिकतो. आपण कसलंही कर्ज काढलं नाही, घरी शेतीही नाही मग माफी कशाची झाली? असा प्रश्न त्याला पडलाय. शिवाय मेसेजमध्ये जो अकॉऊंट नंबर सांगितला गेला आहे. त्या नंबरचं खातंच त्याच्याकडं नाही. कर्जमाफीवरुन एवढा गोंधळ होत असताना ज्यानं कर्जच काढलं नाही त्याला माफी होते, यालाच म्हणतात उपरवाला देता है तो छप्पर फाडके! एवढं होऊनही प्रज्वल म्हणतो होय या माफीचा मी लाभार्थी नाही!
Comments