HOME   व्हिडिओ न्यूज

वैद्यकिय प्रतिनीधींचा राज्यव्यापी संप


लातूर (आलानेप्र): वैद्यकिय प्रतिनिधींच्या राज्य संघटनेतर्फ़े राज्यव्यापी संप पुकारण्य़ात आला असून राज्यातील २५ हजार जणांनी कामे बंद ठेवली. लातूर शहरामध्ये सुमारे जणांनी यात सहभाग घेतला. ०८ तासांची कामाची वेळ असावी इतर क्षेत्रांमध्ये जे नियम आहेत ते नियम ह्याही क्षेत्रात व्हावेत, ओव्हर टाईम लागू करावा. आघाडी सरकारने हा आदेश काढला होता पण तो चुकीचा होता. या सरकारला ०३ वर्षात अनेक शिष्टमंडळे भेटली, निवदने दिली, आंदोलने केले तरीही हे सरकार सुधारीत अध्यादेश काढत नाही. या मागण्यांसाठी कामाच्या तासाच्या अधिसुचनेत सुधारणा करुन ती सलगपणे सकाळी १० ते सांयकाळी ०६ करावी. विक्री संवर्धन कर्मचारी कायद्यानुसार फ़ॉर्म अ प्रमाणे नियुक्तीपत्र मिळावे, तसे नियुक्तीपत्र न देणार्‍या कंपन्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. किमान वेतन २० हजार, महागाई भत्ता आणि किमान वेतनाच्या ५% घरभाडे जाहिर करावे. बोनस, भविष्य निर्वाह निधी कायद्याची कडक अमलबजावणी करावी. केंद्र सरकार प्रस्तावीत कामगार विरोधी कायदे सुधारणा रद्द कराव्या या मागण्यांसाठी वैद्यकिय प्रतिनिधी, लातूर शाखेतर्फ़े टाऊन हॉल ते शिवाजी चौक पदयात्रा काढून निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्याधिकार्‍यांकडे सुपुर्त करण्यात आले. यावेळी किशोर गोविंदपूरकर, भरत बेल्लाळे, उपेंद्र मोहोळकर, प्रमोद गडीकर, अजित देशमुख, धीरज गारठे, जगदिश गंगणे, महेश पाटील, प्रवीण देशपांडे, तोसीफ़ रोजेवाले उपस्थित होते.


Comments

Top