लातूर: यकृत अर्थात लिव्हरचा आजार हा गांभीर्याची बाब होत आहे. भारतामध्ये हा आजार सर्वसाधारण झालेला आहे. उत्तरोत्तर या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आजाराची प्रमुख कारणे म्हणजे बदलती आणि व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि विविध प्रकारची व्यसने त्यातही अतिशय गंभीर गोष्ट म्हणजे केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये यकृताच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजाराच्या प्रतिबंधाबाबत जागरुकता व्हावी या हेतूने सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने मोफत यकृत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ०९ जून रोजी सनराईज हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ०३ दरम्यान हे शिबिर होणार असल्याची माहिती डॉ. मनिष पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी आजाराची कारणे आणि घ्यावयाची काळजी याचीही माहिती दिली. तसेच यकृताच्या आजाराशी लढा दिलेले रुग्ण दिलीप सूर्यवंशी तसेच जिवंत दाते आकाश सूर्यवंशी यांचा लिव्हर चॅम्पियन म्हणून सत्कार करण्यात आला. तर डॉ. मनिष पाठक यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आणि पूर्व नोंदणीसाठी 9673330155 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेत डॉ. मनिष पाठक, डॉ. अभिजीत माने, उदयसिंह पाटील तसेच पत्रकारांची उपस्थिती होती.
Comments