HOME   व्हिडिओ न्यूज

श्वान परवाना घ्या अन्यथा कारवाई

सगळे ठीक पण मोकाट श्वानांचे काय? मनपा सांगत नाही!


लातूर: मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण परिशिष्‍ट 14 नियम 22 (अ) सहकलम 386 अन्‍वये महानगरपालिका हद्दीमध्‍ये श्‍वान पाळण्‍यासाठी महानगरपालिकेचा श्‍वान परवाना घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकारचा फतवा मनपाने काढला आहे पण भटक्या श्वानांचे काय करणार याबाबत मात्र खुलासा करण्यात आलेला नाही. नियमांवर बोट असते पण कर्तव्याचा विसर पडतो!
सर्व श्‍वान धारकांनी आपल्‍या पाळीव श्‍वानाचा परवाना काढण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज आरोग्‍य विभाग, महानगरपालिका, लातूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्‍याकडे ३० दिवसांच्‍या आत दाखल करुन आपला परवाना प्राप्‍त करुन घ्‍यावा. परवान्‍यासाठी लागणारे आवश्‍यक कागदपत्रे विहित नमुन्‍यातील अर्ज, श्‍वानाचे पासपोर्ट साईज ०२ फोटो, नोंदणीकृत पशुवैद्यकाचा अॅंन्‍टी रेबीज व इतर लसीकरण केल्‍याबाबतचा आरोग्‍य दाखला दाखल करणे आवश्यक आहे. वर्षासाठी परवाना शुल्क रु. ५० व नुतनीकरणासाठी रु.२५, ३० दिवसाच्‍या आत नोंदणी न केल्‍यास विहीत विलंब आकारण्‍यात येईल असे मनपाने बजावले आहे. सर्व पाळीव श्‍वानधारकांनी आपल्‍या श्‍वानांची आरोग्‍य (पशुवैद्यकीय) विभाग, मनपा कार्यालय, लातूर येथे नोंदणी करावी अन्‍यथा संबंधितांच्‍या विरुध्‍द मनपाअडून अधिनियमानुसार उचित कारवाई केली जाईल याची नोंद घ्‍यावी असे आवाहन मनपाने केले आहे.


Comments

Top