लातूर: माझा जन्म लातुरात झाला नाही, माझं शिक्षण लातुरात झाले नाही, मी कधी लातुरात राहिले नाही पण लातुरात आल्यावर मला घरी आल्यासारखं वाटतंय असं सांगून गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकरने तरुणाईला जिंकलं. त्यात ‘हम गरीब हुए तो क्या हुआ’ हा टाईमपासमधला फेमस संवाद आणि मला वेड लागले प्रेमाचे हे बहारदार गाणं सादर करुन केतकीने आणखीच रंगत आणली. निमित्त होते औसा मार्गावरील हॉटेल वाटिकाच्या उदघाटनाचे. सतीश बिराजदार, अॅड. शरद इंगळे, विजय डांगे आणि एमएम शेख यांनी हॉटेलच्या उदघाटनानिमित्त केतकी यांना पाचारण केलं होतं. यावेळी तरुणाईनं तोबा गर्दी केली होती.
Comments